खेड(प्रतिनिधी) भरणे नाका येथे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर येथील पोलिसानी अचानक धाड टाकून ७ .३०० रोकड रक्कमे अन्य मुद्देमाल जप्त करत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई २ जून रोजी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली
– प्रभाकर नागनाथ लोहार वय – ३६
वर्षे रा. भडगाव उसरेवाडी ता. खेड , संजय रामचंद्र सकपाळ वय ६२ वर्षे रा. चाकाळे ता. खेड . रमाकांत भुया वनगे वय ४९ वर्षे रा. मुंबई.
अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत
जुगाराचे साहीत्य व रोख रक्कम आपले ताब्यात बाळगुन तीन पत्ती पानाचा पत्त्याचा जुगाराचा खेळ खेळवित असताना मिळून आले म्हणून.गुन्हा दाखल करण्यात आला आहे
–
७,३०० रुपये त्यात १,१५० रु रोख रक्कम ४,००० रु किमतीचा एक लाकडी टेबल त्यावर श्रध्दा सबुरी व अनुक्रमांक ०१ ते १२ असे अंक लिहलेले प्लॅस्टीकचे बॅनर चिटकवलेला ३०० रुपये किमतीचे ०१ इंडीगो बॉक्स त्यांवर ५५५ स्लीम असे लिहलेले कॅटचे बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये १२ पत्त्याचे कॅट मिळून आले












