पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेची नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर 

जिल्हाध्यक्षपदी अनंत मोहिते यांची तर जिल्हा सरचिटणीसपदी नरेश सावंत यांची निवड

लांजा (प्रतिनिधी) पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेची नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर

करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी खेड येथील अनंत मोहिते यांची तर जिल्हा सरचिटणीस पदी संगमेश्वर येथील नरेश सावंत यांची निवड करण्यात आली आहे.

याबाबत संघटनेची सभा नुकतीच रत्नागिरी येथे पार पडली.या सभेत नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली. सदर जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे –

जिल्हाध्यक्ष- अनंत मोहिते, जिल्हा सरचिटणीस- नरेश सावंत ,जिल्हा कार्याध्यक्ष- संजय डांगे.तर उपाध्यक्ष म्हणून विश्वनाथ सुर्वे, प्रकाश कामेरकर, प्रविण त्रिभुवणे, मनोज मिरगुले,कार्यालयीन चिटणीस

शितलकुमार आकुर्डे यांची निवड करण्यात आली.

कोषाध्यक्ष म्हणून रघुनाथ गोरे, सहकोषाध्यक्ष- सचिन कापसे तर कार्यकारिणी सदस्यपदी सुनिल करंबेळे, उदय घाडी, राजेश गुरव, सूर्यकांत साळवी, प्रशांत दळवी,महिला प्रतिनिधी म्हणून सौ. भारती तायशेटये,सौ. प्रियांका सनगरे,सौ. पुजा साळवी,सौ. विलेशा भोसले व सौ. प्रार्थना देसाई यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच संघटक म्हणून संजय कुळये, प्रबोध चव्हाण, संदीप मोहिते, समीर घडशी,प्रसिद्धी प्रमुख राजेश गोसावी, सल्लागारपदी चंद्रकांत पावसकर, संजय दरेकर, अशोक भालेकर, विजय जाधव, उदय शिंदे, संदीप कालेकर व‌ दयानंद लाखण .

सभेला जिल्हाभरातून जवळपास पन्नास ते साठ पदाधिकारी उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचे माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पावसकर,माजी जिल्हा सरचिटणीस दिपक माळी तसेच उदय शिंदे आदींनी अभिनंदन केले.नूतन पदाधिकाऱ्यांचे जिल्हाभरातून अभिनंदन करण्यात येत आहे