अहमदनगरमधील भिंगारमध्ये आज कडकडीत बंद

औरंगजेबाचे पोस्टर झळकवल्याने सकल हिंदू समाजाच्या वतीने बंदची हाक

अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) शहरातील मुकुंदनगर भागात औरंगजेबाचे पोस्टर झळकवण्यात आल्याप्रकरणी आज अहमदनगरमधील भिंगारमध्ये (Bhingar) बंदची हाक देण्यात आली आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने ही बंदची हाक देण्यात आली असून भिंगारमधील व्यापार पेठ ही कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान भिंगारमधील औरंगजेबचा चौथरा उखडून फेकण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला असल्याने शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच खबरदारी म्हणून भिंगारमधील आलमगीर येथील औरंगजेबाच्या मदरशाला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.

लव्ह जिहाद आणि धर्मांतरण कायदा करण्यासाठी तसेच अहमदनगर शहरात औरंगजेबाचे पोस्टर झळकवून त्याचा उदो उदो करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच या घटनांचा निषेध म्हणून भिंगार शहरातील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी व समस्त भिंगार शहर परिसरातील नागरिकांकडून आज रविवारी भिंगार बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान अखंड हिंदू समाज यांच्या वतीने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला याबाबत निवेदन देण्यात आले आहे.