पोईप हायस्कुल येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

मालवण | प्रतिनिधी : पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. इं. द. वर्दम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय विरण पोईपचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी संपन्न झाला.

 

यावेळी व्यासपीठावर पोईप एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल कांदळकर, पोईप सरपंच श्रीधर नाईक, शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साईल, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष संजय पडते, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, विलास माधव, कमलेश प्रभू, महेंद्र पालव, संजय माधव, छोटू ठाकूर, सुरेश नेरुरकर, पंकज वर्दम, महेश पालव, सत्यवान पालव, नंदकिशोर तावडे, अनिकेत तेंडुलकर, मुख्याध्यापक विकास कुंभार व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

प्रत्येक विद्यार्थ्याने ध्येय डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केल्यास यश दूर नाही. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात उच्च पद प्राप्त करण्यासाठी महत्त्वकांक्षा बाळगावी. असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पोईप हायस्कूल येथे केले.

 

यावेळी पुढे बोलताना दत्ता सामंत म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित प्रशालांमध्ये पोईप हायस्कूलचे नाव आहे. या हायस्कूलची प्रगती उत्तरोत्तर वाढत आहे. पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष अनिल कांदळकर, सर्व संचालक, प्रशालेचे सर्व शिक्षक यांच्या योग्य समन्वयातून शाळेची वाटचाल चालली आहे. सर्वजण चांगल्या प्रकारे काम करत आहे. याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देतो.

 

पोईप हायस्कूलसाठी आपण खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिलेला आहे. प्रशालेत शिल्लक कामे ग्रंथालय तसेच शिक्षकांसाठी अध्यायावत स्टाफ रूमची मागणी असून याबाबत पाठपुरावा करू असे आश्वासन दत्ता सामंत यांनी दिले.

 

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक विकास कुंभार यांनी प्रशालेच्या प्रगती बाबत आढावा घेतला. यावेळी उपस्थित मान्यवरांतून दादा साईल, संजय पडते, संजय माधव, अनिल कांदळकर व इतरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दशक्रोषितील देणगीदारांनी दिलेल्या रोख रक्कमेतून इयत्ता पाचवी ते बारावी मधील विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात पारितोषक देण्यात आले. यावेळी सुमारे 80 हजाराच्या वर रक्कमेच्या देणगीतून विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी प्रशालेचे सर्व सहाय्यक शिक्षक, जूनियर कॉलेजचे शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतकी सावंत, श्री पवार, प्रास्ताविक विकास कुंभार तर आभार विष्णू महाजनी यांनी व्यक्त केल.

 

)