गोळवण येथे 9 डिसेंबर रोजी ग्राम स्वच्छता शिबिर!

मसुरे | झुंजार पेडणेकर श्री देव शेबार देवस्थान गोळवण येथे आदर्श गाव संकल्प व प्रकल्प गोळवण येथे 9 डिसेंबरयोजने अंतर्गत ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल मार्फत ग्रामस्वच्छता व वैयक्तिक स्वच्छता शिबिर कार्यक्रम ०९ डिसेंबर रोजी सकाळी ०९:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी गाव गोळवण, कुमामे व डिकवल मधील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री सुभाष लाड सरपंच तथा अध्यक्ष आदर्शगाव ग्रामस्तरीय समिती
ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल यांनी केले आहे.