ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत

खेड: प्रतिनिधी – ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) संचालित मोरवंडे-बोरज येथील ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE) या शाळेतील पाच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेतील राज्य गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. इयत्ता ५वी आणि ८वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

राज्य गुणवत्ता यादीत निवड झालेले विद्यार्थी:

इयत्ता ५वी (CBSE/ICSE)

कु. प्रेम मनोज सकपाळ – १२वा

कु. श्रद्धा स्वानंद कासुकर – १५वी

कु. श्रीतेज रुपेश काते – १५वा

इयत्ता ८वी (CBSE/ICSE)

कु. अभेद्य देशमाने – ८वा

कु. एकांश दळवी – १०वा

महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेनुसार, गुणवत्ता यादीत इयत्ता ५वीतील ३८ पैकी २० विद्यार्थी आणि इयत्ता ८वीतील ३८ पैकी २६ विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकले.

या यशामागे शाळेतील शिक्षक, पालक, संस्था चालकांचे मोलाचे योगदान असून नियमित अभ्यास, प्रश्नपत्रिका सराव, चुका शोधून सुधारणा ही कार्यपद्धती विद्यार्थ्यांच्या यशास कारणीभूत ठरली.

या विद्यार्थ्यांना प्राचार्य भरत मोरे, श्री. प्रतीक पवार, सौ. शर्वरी शिर्के, सौ. स्नेहलता खोपडे, सौ. विधी भोसले, श्री. प्रवीण कांबळे, श्री. महेश चिले, सौ. सुनंदा ठोंबरे, श्री. प्रलय शिंदे यांचे तसेच पुणे येथील तज्ज्ञ मार्गदर्शक श्रीरंग बापट यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष श्री. अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष रमणलाल तलाठी, सरचिटणीस व शाळा समितीचे चेअरमन माधव पेठे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, जनसंपर्क अधिकारी दीपक लढ्ढा, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद व इतर आस्थापनांचे प्रमुख यांनी अभिनंदन केले आहे.