भिरवंडे कदमवाडी येथील ग्रामस्थांचा भाजप मध्ये प्रवेश

उबाठा विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांना मोठा धक्का

पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले पक्षात स्वागत 

कणकवली : तालुक्यातील भिरवंडे येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते व भिरवंडे विकास सोसायटी चे संचालक संजय उर्फ छोटु कदम व भिरवंडे कदमवाडी येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली ओम गणेश निवास्थानी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला.

 

यावेळी माजी जि.प.अध्यक्ष संदेश सावंत, संजना सावंत, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, राजू पेडणेकर, मयुरी मुंज, मीनल पवार राजश्री पवार आदी उपस्थित होते.

 

पालकमंत्री ना. नितेश राणे यांची विकास कामे करण्याची कार्यपद्धती तसेच माजी जि. प अध्यक्ष संदेश सावंत व संजना सावंत यांची गावच्या विकासासाठी असलेली तळमळ याने प्रेरित होऊन कदमवाडीच्या विकासासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करीत आहोत, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.