आंजर्ले व केळशी समुद्रकिनारी वाहून आले दोन मृतदेह

उलट सुलट चर्चांना उधाण

*दापोली l प्रतिनिधी:* दापोली तालुक्यातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या आंजर्ले व केळशी या दोन समुद्रकिनारी बुधवारी सकाळी पुरुष जातीचे दोन अज्ञात मृतदेह वाहून आले आहेत. यापैकी एक मृतदेह विवस्त्र असल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे

दापोली तालुक्यातील आंजर्ले व केळशी या दोन समुद्र किनाऱ्यावर बुधवारी सकाळी हे दोन मृतदेह वाहून आले. ही घटना ग्रामस्थांना कळल्यावर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर मृतदेह 50 वयोगटातील इसमांचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र सदर मृतदेह नुकत्याच झालेल्या धुवांधार पावसात वाहून आलेले आहेत किंवा त्यांच्याशी घातपात झालेला आहे का याबाबत आत्ताच माहिती देणे शक्य नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

या घटनेचा अधिक तपास आडे दूरक्षेत्राचे पोलीस अंमलदार राजू मोहिते करत आहेत.