संगमेश्वर. : १५ मार्च २०२४ रोजी लागू करण्यात आलेल्या नवीन संचमान्यतेच्या निर्णया संदर्भात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने आपल्या मागण्यासंदर्भात चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांची भेट घेत निवेदन सादर केले तसेच संच मान्यतेच्या आदेशासंदर्भात विधानसभेत आवाज उठवल्याबद्दल आभार मानले.
या निवेदनात खालील मागण्यांचा समावेश होता.
१५मार्च २०२४ चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करणे, मुख्यालयी राहण्याचा शासन आदेश रद्द करणे, शिक्षण सेवक पद रद्द करून नवनियुक्त शिक्षण सेवकांना नियमित शिक्षक करणे,शिक्षकांना मेडिक्लेम सुविधा उपलब्ध करून देणे,सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करणे,आदर्श शिक्षकांना एक वेतन वाढ लागू करून देणे,केंद्रीय प्रमुखांना पदोन्नती देणे,शिक्षकांना क्यू आर कोड असलेले डिजिटल आय कार्ड उपलब्ध करून देणे.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर,चिपळूण तालुकाध्यक्ष सतीश सावर्डेकर,संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रवीण सावंत,सदस्य आनंद देशपांडे,मनोज घाग, सय्यद आदम,अजय उपरे,अरविंद पवार, रवींद्र शिवडे,अजित कांबळे आदी शिक्षक उपस्थित होते.












