मंडणगड | प्रतिनिधी
मंडणगड येथील एन. एक्स. सोसायटीमध्ये राहणारे अभिजीत प्रकाश विलणकर (वय ४५) यांच्या बंद घरात १८ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या घरफोडी करत सुमारे ३४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.
विलणकर यांच्या घरात कोणीही नसताना चोरट्याने घराच्या समोरील दरवाजावरील कडीकोंडा उचकटून व कडी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मिळून एकूण ३४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी अभिजीत विलणकर यांनी त्याच दिवशी, १८ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.












