चिपळूण (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज युवा आघाडीच्या वतीने लांजा येथे वह्यांचा प्रकाशन समारंभ संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर यांनी रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज युवा आघाडीच्या वतीने घेण्यात येणारे सर्व उपक्रम हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केले. व आपल्या मनोगतातून संत गोरोबाकाका यांची महती युवकांसमोर स्पष्ट केली.
रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज युवा आघाडीच्या वतीने लांजा येथे युवा आघाडी कार्याध्यक्ष पंढरीनाथ मायशेट्ट्ये यांच्या हॅप्पी पंजाबी ढाब्या शेजारी या गेट-टुगेदर, रबरी क्रिकेट बॉल स्पर्धा स्पर्धा तसेच व जिल्हा युवा आघाडीने तयार केलेल्या वह्यांचे प्रकाशन व वृक्षारोपण समारंभ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन दि. २० जुलै रोजी करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद ईवलेकर, लांजा तालुका अध्यक्ष संतोष तुळसणकर, खेड तालुकाध्यक्ष अनंत पालकर, पोलीस अधिकारी श्री. गिरकर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख विजय निवळकर, उमेश खैर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मिलिंद इवलेकर यांनी सुद्धा आपल्या मनोगतात जिल्हा युवा आघाडीचे काम अभिनंदननीय असल्याचे नमूद केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रबरी क्रिकेट बॉल स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून सहा संघ सहभागी झाले होते. यामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी चिपळूण तालुका युवा आघाडी द्वितीय क्रमांक मानकरी गुहागर तालुका युवा आघाडी व तृतीय क्रमांक मानकरी लांजा तालुका युवा आघाडीने आपले नाव कोरले. यावेळी बेस्ट बॉलर म्हणून राज (गुहागर), बेस्ट बॅट्समन म्हणून (बंड्या) चिपळूण व मालिकावीर म्हणून सुधीर माखजनकर (गुहागर) यांनी मानांकन पटकावले. क्रिकेट स्पर्धा झाल्यानंतर लांजा कुंभारवाडी या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज युवा आघाडी कार्याध्यक्ष व लांजा तालुका युवा आघाडी अध्यक्ष पंढरीनाथ मायशेट्ट्ये यांनी केले. तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष महेश पडवेकर, सचिव सुधीर जामसुतकर, उपाध्यक्ष योगेश गुहागरकर, जिल्हा संघटक नाना पालकर, जिल्हा संघटक निलेश कुंभार, जिल्हा मीडिया अध्यक्ष रविंद्र शिरकर, चिपळूण तालुका सोशल मीडिया अध्यक्ष अनिल पडवेकर, जिल्हा युवा जिल्हा आघाडी पदाधिकारी अमित बुरंबाडकर व सर्व जिल्हा पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी उत्तम प्रतिसाद दिला. क्रिकेट स्पर्धांचे समालोचन विक्रांत टेरवकर यांनी तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश कुंभार सर यांनी केले.












