एस.एस.पी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘Cyber Smart AI Prime’ कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न

कणकवली – एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, हरकुळ बुद्रुक, येथे NIIT Foundation, मुंबई यांच्या सहकार्याने ‘Cyber Smart AI Prime’ ही कार्यशाळा दिनांक ८ जुलै ते १२ जुलै २०२५ व १५ जुलै ते १९ जुलै २०२५ या कालावधीत यशस्वीरित्या पार पडली.

 

या कार्यशाळेमध्ये बी.ई. व टी.ई. वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) यावर आधारित मूलभूत प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये कोर सिक्युरिटी संकल्पना, नेटवर्क प्रोटोकॉल्स, क्रिप्टोग्राफी, AI यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता. सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील मूलभूत ज्ञान मिळवून त्यात करिअरची दिशा मिळावी हा यामागील उद्देश होता.

 

कार्यशाळेचे मुख्य Resource Person श्री. आशुतोष मौर्या, (Cyber Security Trainer at NIIT Foundation, Mumbai) यांनी सखोल तांत्रिक मार्गदर्शन केले. त्यांनी Live Demonstration चा वापर करून विविध संकल्पनांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना दाखवली.

 

कार्यशाळेतील वैशिष्ट्ये:

तज्ज्ञांचे सत्र (Expert Sessions)

प्रात्यक्षिक सादरीकरण (Live Demonstration)

सहभागी विद्यार्थ्यांना CISCO या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नेटवर्क अकादमीच्या चे प्रमाणपत्र .

 

कार्यशाळेचे आयोजन प्रा. ई. एल. मांजरेकर (TPO) व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यशाळेचा लाभ घेतला. सायबर सुरक्षा क्षेत्रात करीअर घडवण्यासाठी हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरला. विद्यार्थ्यांचा सहभाग उत्स्फूर्त होता आणि कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांच्या समाधानकारक प्रतिसादाने झाली.