अपघातास निमंत्रण ठरणारे खड्डे रिक्षा चालकांनी स्वखर्चाने बुजवले

बांधकाम प्रशासनाचे दुर्लक्ष ; अखेर भरड तारकर्ली नाका येथील रिक्षा चालकांनी सिमेंट काँक्रीटने बुजवले खड्डे

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील भरड तारकर्ली नाका मार्गावर रस्त्यात मोठा खड्डा पडला होता. दुचाकी खड्डयात गेल्याने याठिकाणी अपघातही घडले होते. प्रशासनाचे लक्ष वेधुनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने आदर्श रिक्षा चालक मालक संघटना भरड मालवण येथील रिक्षा चालकांनी पुढाकार घेत सिमेंट काँक्रीटने खड्डे बुजवले.

अध्यक्ष पप्या कद्रेकर, सुधाकर खोत, संतोष मयेकर, शैलेश लुडबे, जॉनी मेंढीस, मुन्ना मिठबावकर, भाई कांबळी, मंगेश मिठबावकर, प्रसाद वराडकर, राकेश गांवकर व अन्य सहकारी याच्या सहकार्याने हे खड्डे बुजवण्यात आले आहेत. अपघातास निमंत्रण ठरणारे खड्डे बुजवण्यात आल्याने वाहन चालक व पादचारी यांनी रिक्षा व्यावसायिकांचे कौतुक केले आहे.

 

फोटो : मालवण शहरातील भरड तारकर्ली नाका मार्गावरील खड्डे रिक्षा चालकांनी स्वखर्चाने बुजवले. (अमित खोत, मालवण)