राकेश परब मित्रमंडळाच्या स्तुत्य उपक्रमाचे होतेय कौतुक
मसुरे | झुंजार पेडणेकर : वडाचापाट प्राथमिक शाळा येथे राकेश परब मित्रमंडळ यांच्या वतीने वह्या आणि दप्तरे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सौ.सोनिया प्रभुदेसाई, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई , उपसरपंच सचिन पाताडे, सदस्य विनायक प्रभूदेसाई, उद्योजक दयानंद प्रभुदेसाई, तंटामुक्ती अध्यक्ष प्रथमेश पालव, श्रीकांत पाटकर, दिनेश चव्हाण, सचिन हडकर, श्रीनिवास हडकर, शाळेतील शिक्षक परब मॅडम, पालव मॅडम , पवार सर विद्यार्थी उपस्थित होते. शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी यापुढेही सर्वतोपारी प्रयत्न यपुढेही केले जातील. अभ्यास करून नाव कमवा आणि पुढील जीवनात यशस्वी व्हा असे प्रतिपादन यावेळी माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई यांनी यावेळी केले. शैक्षणिक साहित्य भेट दिल्याबद्दल प्रशालेच्या वतीने आभार मानन्यात आले.












