परुळे येथे उपस्थित राहत बीएसएनएल चे उपप्रबंधक सागर जोरावले यांनी पंचक्रोशीतील तक्रारी घेतल्या समजून

परुळे : प्रतिनिधी
खासदार श्री नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशावरून वेंगुर्ला तालुक्यातील परुळे/म्हापण पंचक्रोशीतील बीएसएनएल च्या तक्रारी जाणून घेण्यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या मार्गदर्शनाने आज मंगळवारी बीएसएनएल चे उप प्रबंधक श्री. सागर जोरावले यांनी ग्रामपंचायत परुळेबाजार येथे उपस्थित राहत ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेतल्या.

यावेळी परुळेबाजार, कुशेवाडा, भोगवे, चिपी, कर्ली, म्हापण , केळुस येथील टॉवर समस्या व बीएसएनएल सेवेची अनियमितता निदर्शनात आणुन देण्यातआली. माजी सभापती निलेश सामंत, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, उपसरपंच संजय दूधवडकर, व्हा. चेअरमन प्रसाद पाटकर, प्रकाश चव्हाण, साईनाथ माड्ये, गुरुनाथ मडवळ , भोगवे उपसरपंच रुपेश मुंडये, चेअरमन देवदत्त साळगावकर, जगदीश म्हापणकर, ग्रा सदस्य अभय परुळेकर, सीमा सावंत, सुनील राऊत, श्री. खोत, सुनील चव्हाण, सचिन सामंत, प्रथमेश नाईक, सुधीर पेडणेकर, आपि कोलंबकर, परशुराम चव्हाण, यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बीएसएनएल च्या असंख्य तक्रारीचा पाढा वाचण्यात आला. नेटवर्क तक्रारी मुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांना महत्त्वाची असणारी बँक ऑफ महाराष्ट्र स्थलांतर करण्याच्या तयारीत आहे, असे झाले तर त्याचा मोठा फटका पंचक्रोशीतील ग्रामस्थांन बसेल याच बरोबर पंचक्रोशीत 10 बीएसएनएल टॉवर आहेत परंतु सर्व काही ना काही तक्रारी आहेत. त्या तक्रारीचे सोडवणूक करणे गरजेचे आहेत. तरी उपस्थित अधिकाऱ्यांनी या सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू असे आश्वासन दिले.