घर जमीनदोस्त झालेल्या माडखोल येथील नारायण ठाकूर यांना मदतीची गरज.

 ओटवणे (प्रतिनिधी) जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे घर कोसळून जमीनदोस्त झालेल्या माडखोल ठाकुरवाडी येथील नारायण ठाकूर यांना या संकटातून सावरून पुनः एकदा उभ राहण्यासाठी आणि निवारा उभा करण्यासाठी मदतीची गरज आहे.समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या घटनेत त्यांच्या च्या घराचे मोठे नुकसान झाले असले तरी केवळ दैव बलवत्तर म्हणून ते या घटनेतून बचावले.या घडलेल्या घटनेचा त्यांना जबर धक्का बसला असून माडखोल ठाकूर वाडी ग्रामस्थानी त्यांना धीर देत त्यांना राहण्याची तात्पुरती व्यवस्था केली. मात्र ही तात्पुरती सोय असून आधीच हालाकीची परिस्थिती असणाऱ्या नारायण ठाकूर यांना घर कस उभ करायचं हा मोठा प्रश्न पडला आहे.

विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सभापती आणि प्रत्येकाच्या वेळ प्रसंगी धावून जाणारे मंगेश तळवणेकर यांनी घटना कळताच नारायण ठाकूर यांना भेटून धीर देत १० हजार रुपयाची मदत केली. या कठीण प्रसंगातून उभ राहण्यासाठी ही मदत लाख मोलाची असून देवासारखे धावून आलेल्या मंगेश तळवणेकर यांचे त्यांनी आभार मानले.

नारायण ठाकूर यांची आर्थिक स्थिती गरिबीची आहे.त्यांचे उत्पन्नाचेही कोणतेही साधन नसल्याने भर पावसाळ्यात त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे समाजातील दात्यांसह स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी.असे आवाहन कारण्यात येत आहे. ज्यांना मदत करायची आहे त्यांनी नारायण शिवराम ठाकूर, बँक – बँक ऑफ इंडिया, शाखा – माडखोल, खाते नं. – १४९११०११०००३९५५, आय एफ एस सी कोड बी के आय डी- ०००१४९१ या अकाउंट नंबर वर मदत करावी.