जैतापूर ( वार्ताहर), दि. ३० जून:
‘आमदार किरण उर्फ भय्याशेठ सामंत सन्मान – जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ यांच्या वतीने आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याने शानदार खेळ करत पुरुष एकेरी गटात विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत जिल्हाभरातून सर्व गटांतील सुमारे १२० खेळाडूंनी सहभाग घेतला.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अभिषेक चव्हाणने आंतरराष्ट्रीय खेळाडू रियाज अकबर अली याच्यावर ०१–२५, २५–०७ आणि २५–२० अशा सेट्समध्ये विजय मिळवला. पहिला सेट गमावल्यानंतर अभिषेकने आक्रमक खेळ करत बाजी मारली.
पुरुष दुहेरी गटात देवरूखच्या राहुल भस्मे व चिपळूणच्या मुक्तानंद वरवडेकर यांनी संजय आणि योगेश कोंडविलकर या देवरूखच्या जोडीचा तीन सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद मिळवले. महिला गटात रत्नागिरीच्या स्वरा मोहिरे हिने राजापूरच्या निधी सप्रेचा १७–०७, १७–०५ असा पराभव करत बाजी मारली.
कुमार गटात रत्नागिरीच्या ओम पारकर याने जैतापूरच्या हर्षल पाटीलवर तर किशोर गटात जैतापूरच्या वेदांत करगुटकर याने राकीब तडवीवर विजय मिळवत आपापल्या गटात अव्वल ठरले.
स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे:
पुरुष एकेरी
– अंतिम: अभिषेक चव्हाण विजयी, रियाज अकबर अली (०१–२५, २५–०७, २५–२०)
– उपांत्य:
रियाज अ.अली विजयी, अनिल गांधी (२५–१०, २५–०५)
अभिषेक चव्हाण विजयी, राहुल भस्मे (२५–१२, २५–०७)
पुरुष दुहेरी
– अंतिम: राहुल भस्मे/मुक्तानंद वरवडेकर विजयी
विरुद्ध संजय/योगेश कोंडविलकर (१०–१२, १२–१०, १२–१०)
– उपांत्य:
भस्मे/वरवडेकर विजयी, विजय कोंडविलकर/दामोदर घाणेकर (१०–०८, ११–०९)
संजय/योगेश कोंडविलकर विजयी, रियाज/अभिषेक (१२–१५, १५–१०, १०–०८)
महिला एकेरी
– अंतिम: स्वरा मोहिरे विजयी, निधी सप्रे (१७–०७, १७–०५)
– उपांत्य:
मोहिरे विजयी, स्वप्नाली खरात (२३–००, २३–००)
निधी सप्रे विजयी, सोम्या गुरव (२५–००, २५–००)
कुमार गट
– अंतिम: ओम पारकर विजयी, हर्षल पाटील (१९–०१, १५–०१)
– उपांत्य:
ओम पारकर विजयी, सर्वेश अमरे (२५–०८, २५–०५)
हर्षल पाटील विजयी, आर्यन राऊत (१२–०६, ०८–०६)
किशोर गट
– अंतिम: वेदांत करगुटकर विजयी, राकीब तडवी (१६–१५, २५–१८)
– उपांत्य:
करगुटकर विजयी, शर्वेल पावसकर (१०–०१, ०९–०७)
राकीब तडवी विजयी, कपिश देसाई (१९–०८, १०–०६)
सन्माननीय उपस्थिती:
बक्षीस समारंभास लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत, श्री. गिरीश करगुटकर (अध्यक्ष, जैतापुरचा राजा मंडळ), प्रदीप भाटकर (अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन), श्री. मिलिंद साप्ते (सचिव), प्रकाश कानिटकर, सागर कुलकर्णी (पंच), स्पर्धा प्रमुख एकनाथ पाटील व मंडळाचे कार्यकर्ते तसेच कॅरमप्रेमी उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जलाल काझी यांनी मोफत हॉल उपलब्ध करून दिला. संयोजनासाठी श्री. गिरीश करगुटकर, श्रीकृष्ण राऊत, प्रसाद मांजरेकर, ॲड. शशिकांत सुतार, अशपाकशेठ हाजू, रविन्द्र नागरेकर, अजित नारकर, दीपक बेंद्रे, सिद्धी शीरसेकर, राजन काँडेकर, राजा काजवे, समिर शिरवाडकर, सत्यवान आडीवरेकर, जानवी गावकर, नंदू मिर्गुले, राकेश दांडेकर, तसेच जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, कार्यकर्ते उपस्थित होते.











