उत्तर मंडळ अध्यक्ष विराज हरमले यांनी दिली माहिती
लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुका भाजपा उत्तर मंडळाची नूतन कार्यकारिणी अध्यक्ष विराज हरमले यांनी जाहीर केली आहे. सहा उपाध्यक्षांसह ६० जणांची ही जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे .
उत्तर मंडळाची नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे -अध्यक्ष विराज हरमले यांच्यासह उपाध्यक्ष- श्रीधर कबनूरकर, प्रबोध आठल्ये ,अनंत चौगुले, सौ. शारदा गुरव, मिलिंद आठल्ये ,सौ अपेक्षा दाभोळकर तक्ष सरचिटणीस म्हणून प्रथमेश बेंडल, आणि संतोष चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे . चिटणीस पदी श्रेयस मुळे, दिनेश चापडे, सौ तन्वी दाभोळकर, सौ मुग्धा जोगळेकर, राजेंद्र कीर, राजीव चव्हाण यांची निवड करण्यात आली असून कोषाध्यक्षपदी सचिन आठल्ये यांची निवड करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे कार्यकारणी सदस्य म्हणून संतोष पानगले ,सौ रेश्मी जोशी, अजय गुरव, श्रीनिवास गुण्ये, सौ तेजस्विता कांबळे, सौ प्रेरणा कोटकर, श्रीमती अपर्णा शिंदे ,निचिकेत पेंढारी, जयवंत बंडबे, रामचंद्र नार्वेकर ,सुरेश तोडणकर, गणपत कालकर, महेश मेस्त्री, प्रफुल्ल कांबळे, समीर पांचाळ, दीपक दाभोळकर, कृष्णा जाधव सौ अंजली पानगले, शामू मांडवकर, दिनेश निवदेकर, अरविंद गुरव ,मधुकर गुरव, अक्षता कांबळे, लेजीम मुल्ला, संकेत जोशी, सौ सुप्रिया बेंद्रे, अथर्व सप्रे, नितेश गांधी, एकनाथ शिंदे, निखिल गुरव ,सौ रूपाली कीर, स्वरदा केतकर, सौ अंजली केतकर, स्नेहल पेनसे, अनिल गांधी, संदेश शिर्के, योगेश लिंगायत, मकरंद जोगळेकर ,मधु आठल्ये , प्रकाश कांबळे, सदानंद बने, मोहिनी कांबळे, वंदना जायगडे, भगवान झोरे यांची निवड करण्यात आली आहे.
सर्वसामान्य आणि क्रियाशील कार्यकर्त्यांना या कार्यकारणीत स्थान देण्यात आले असून त्याचा फायदा आगामी काळात पक्ष वाढीसाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पक्षाला होईल असा विश्वास उत्तर मंडळ अध्यक्ष विराज हरमले यांनी व्यक्त केला आहे.











