वारंवार वीज गायब होत असल्याने होत होती गैरसोय!!
ग्रामीण भागातील ग्राहकांची गैरसोय दूर!!!

दोडामार्ग l प्रतिनिधी :तालुक्यातील अनेक माजी सैनिकाची पेन्शन बँक ऑफ इंडिया शाखेत जमा होत असते अनेक वेळा ग्राहकांना नेटवर्क नसल्याने पैसे मिळत नव्हते तसेच वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने मोठया प्रमाणात गैरसोय होत होती या बाबत नुकतेच नव्याने रुजू झालेले वरिष्ठ शाखा प्रबंधक शरद पेंडामकर यांच्या प्रयत्नातून ग्राहकांच्या आग्रहखातर बँकेने सर्व ग्राहकांना सोय व्हावी यासाठी जनरेटरची व्यवस्था केली आहे त्यामुळे आता ऑफ लाईन वर अवलंबून राहावे लागणार नाही नेटवर्क सह विजेची समस्या सुटल्याने ग्राहकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे
या सेवेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला यावेळी शाखा प्रबंधक शरद पेंडामकर शुभम गावडे, श्री मूर्ती नंदकिशोर के, अनिल टेकाडे,समीर राऊत, अक्षय कुमार आंजी नाईक,निरजा के, नम्रता देसाई, वनश्री गवस आदी सह ग्राहक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते











