धारगळ येथे बस – दुचाकी अपघातात युवक ठार

पेडणे (प्रतिनिधी) :

धारगळ – दोन खांब राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस आणि दुचाकी यांच्यात अपघात होऊन दुचाकीस्वार सुदीप रवी पैकर (१८) हा युवक जागीच मरण पावला. बस चालकाला पेडणे पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. सदर अपघात बुधवारी दुपारी झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर – पणजी ही एसटी (एमएच १४ के क्यू ९७५३) पणजी येथे जात होती. त्याच बाजूने (जीए ०३ एजी ५६२८) या दुचाकीने सुदीप पैकर हा युवक जात होता. प्रवासी बसने दुचाकीला मागून धडक दिल्यानंतर दुचाकी चाकाखाली आली आणि सुदीप हा युवक चाकाखाली चिरडून ठार झाला. घटनेची माहिती पेडणे पोलिसांना मिळताच पेडणे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. एसटी प्रवासी चालकाला ताब्यात घेण्यात आले.

सुदीप पैकर हा नेरूळ येथील फ्रान्सिसको डिकोस्टा यांच्याकडे फलक जाहिरातीचे काम करत होता. कामानिमित्त तो धारगळ मध्ये आला होता. घरी जात असताना हा अपघात घडला. एसटी बसची नंबर प्लेट व्यवस्थित नव्हती. पेडणे पोलिसात चालका विरोधात गुन्हा दाखल केला.