रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

रत्नागिरी : जिल्ह्यात आज, 1 ऑगस्ट 2025 रोजी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचं दिसून आलं आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 93.79 मिमी पावसाची नोंद झाली असून, सरासरी पर्जन्यमान 10.42 मिमी इतकं राहिलं आहे.
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी:
* मंडणगड: 22.00 मिमी
* खेड: 14.28 मिमी
* चिपळूण: 14.11 मिमी
* दापोली: 10.42 मिमी
* गुहागर: 10.40 मिमी
* संगमेश्वर: 7.83 मिमी
* राजापूर: 7.00 मिमी
* लांजा: 5.20 मिमी
* रत्नागिरी: 2.55 मिमी
आज मंडणगड तालुक्यात सर्वाधिक 22 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर रत्नागिरी तालुक्यात सर्वात कमी 2.55 मिमी पाऊस पडला