न्हावेली । प्रतिनिधी : मळेवाड कोंडूरे गावात काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आनंद न्हावी यांना संत सेना मळेवाड पंचक्रोशी नाभिक संघटनेने मदतीचा हात दिला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी न्हावी यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली आणि त्यांना आर्थिक मदत देऊन धीर दिला.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी अजय तळवणेकर, सुनील न्हावेलकर, आनंद न्हावेलकर, संदेश आरोसकर, नंदकिशोर चव्हाण, सखाराम चव्हाण आणि नवनाथ तिरोडकर उपस्थित होते. या मदतीमुळे आनंद न्हावी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.












