रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. जिल्ह्यामध्ये सरासरी ९.५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये मंडणगड तालुक्यात सर्वाधिक १० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज एकूण ८५.९३ मिमी पाऊस झाला आहे. मंडणगडनंतर खेड तालुक्यात २१.७१ मिमी, दापोली तालुक्यात १०.४२ मिमी, चिपळूण तालुक्यात ६.६७ मिमी, गुहागर तालुक्यात ९.२० मिमी, संगमेश्वर तालुक्यात २.१६ मिमी, रत्नागिरी तालुक्यात १२.५५ मिमी, लांजा तालुक्यात ७.६० मिमी आणि राजापूर तालुक्यात ५.६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या तरी रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन सामान्य असून, पावसाची पुढील स्थिती पाहता प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.












