चिपळूण (वार्ताहर) : प्रतिवर्षी प्रमाणे चिपळूणच्या ब्राह्मण संघात तिसऱ्या श्रावण मंगळवारी म्हणजेच दि. १२ रोजी मंगळागौर पूजनाचे आयोजन केले आहे. ज्या सुवासिनींना यासाठी सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपली नावनोंदणी संघाच्या महिला विभागातील पुढील महिला सदस्यांकडे करावी.
सौ. रेखा (मृदुला) बापट, बापट आळी, सौ. माधुरी बापट खेंड, सौ.सुखदा परांजपे, कावीळतळी चिपळूण, सौ. स्मिता देवधर रावतळे यांच्याकडे नावनोंदणी करावी. नोंद करणाऱ्या वशेळ्यासाठी नोंदणी शुल्क १५० रूपये आहे. शुल्कासह नोंदणी करावी. दि. १२ रोजी पूजेची वेळ सकाळी ९.३० वाजता आहे. पूजेला येताना पूजेची सर्व तयारी आपल्या सोबत आणावयाची आहे. सोबत पळीभांडे ताम्हन आणावयाचे आहे. दि. १२ रोजी अंगारकी चतुर्थी आहे, ज्या महिलांचा उपास असेल त्यांनी तशी नोंद करावी. सकाळी पूजन आणि भोजनाची व्यवस्था आहे. सायंकाळी मंगळागौरीचे खेळ खेळायचे आहेत. त्यासाठी सर्वांनी ४.३० वाजता उपस्थित राहावे. सर्व महिलांनी एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन चिपळूणच्या ब्राह्मण सहाय्यक संघाच्या महिला विभागाने केले आहे.












