फोंडाघाट सज्जा– महसूल विभागाचे काम नेहमीच लोकाभिमुख — सरपंच सौ. संजना आग्रे.

*महा स्वराज्य अभियानांतर्गत फोंडाघाट येथे शासकीय सेवा थेट जनतेपर्यंत —-*

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी— जिल्ह्यामध्ये राबविल्या जाणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत महसूल सप्ताह कणकवली विभागा कडून आज फोंडाघाट मंडळातर्फे ग्रा.प.छ. शिवाजी महाराज सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करून आणि गणेश व छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.

 

 

यावेळी सरपंच सौ संजना आग्रे, नायब तहसीलदार एम.बी.मंडले, मंडल अधिकारी प्रवीण मोंडे, सदस्य मिथिल सावंत, विठ्ठल लाड, सुभाष सावंत, पवन भोगले, ग्रामसेवक मंगेश राणे, ग्राम महसूल अधिकारी समृद्धी गवस– फोंडाघाट, श्रिया शिंदे– हरकुल खुर्द,अमृता भुसके– लोरे, गणेश शिंदे — घोणसरी, गोजिरी गोडे — करंजे, पोलीस पाटील फोंडाघाट- सुधीर तेली, महाविद्यालयाचे प्रा. विनोदसिंह पाटील,मंडळातील सेतू केंद्र प्रतिनिधी,शेतकरी, मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

यावेळी विविध महसूल विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली.मान्यवरांचे हस्ते संजय गांधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तहसीलदार कणकवली यांच्याकडून मंजूर लाभ आदेशाचे वितरण करण्यात आले. लाभार्थ्यांना सत्यापन प्रमाणपत्रे व रेशन कार्ड वाटप करण्यात आले.तसेच सातबारा उतारे — उत्पन्न — अधिवास– जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. वारस तपास अर्ज स्वीकृती करण्यात आली …

 

 

सरपंच संजना आग्रे यांनी फोंडाघाट महसूल विभागाच्या कामाचे कौतुक करताना, ग्रामस्थांनी सुद्धा त्यांना समजून घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले, सोसायटी चेअरमन राजन नानचे यांनी फार्मर आयडी सर्वांनी त्वरित काढून घ्यावा असे आवाहन करताना, संवेदनशील फोंडाघाट सज्जा साठी कायमस्वरूपी महसूल अधिकाऱ्याची प्रशासनाकडे आग्रही मागणी केली. महसूल अधिकारी शिंदे यांनी ॲग्री स्टॅक व ई पिक पाहणी याबद्दल मार्गदर्शन करून सर्वांनी वेळेत पूर्ण करून घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रिया शिंदे आणि सुसूत्रसंचालन गोजिरी गाडे यांनी केले…