भाजपाच्या नेत्यांवर बोलाल तर यापुढे जशास तसे उत्तर देऊ
उठा.. कामाला लागा 2024 ला पुन्हा मोदींना पंतप्रधान करायचंय
कार्यकर्त्यांना राणेंचे आवाहन
एका दिलानं, एका विचाराने आणि निष्ठेने पक्षासाठी काम करा
राजापुरातील ग्रीन रिफायनरी प्रकल्प मार्गी लागणार
राजापूर | प्रतिनिधी : देशाच्या पंतप्रधानपदाची सुत्रे हातात घेतल्यापासून आजपर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहोरात्र देशासाठी काम करत आहेत. कित्येक वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रसला जे जमलं नाही ते मोदींनी नऊ वर्षात करून दाखविले आहे. आत्मनिर्भर आणि लोकल्याणकारी भारत देश जगासमोर आणण्याचे काम मोदींनी केले आहे त्यामुळेक् मोदींच्या कष्टांना साथ देणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे हे लक्षात घ्या आणि सन 2024 ची निवडणूक जिंकण्यासाठी आणि पुन्हा मोदींना पंतप्रधान करण्याठी भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम घराघरात पोहचवा असे आवाहन केंद्रीय उद्योग मंत्री ना. नारायण राणे यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर यांच्या समोर ज्यांची उभी रहाण्याची लायकी नाही अशी मंडळी त्यांच्यावर टिका करत आहेत, मात्र आपण हे मुळीच खपवून घेणार नाही यापुढे जर का अशा प्रकारे आमच्या नेत्यांवर टिका केली तर जशास तसे उत्तर देऊ असा ईशाराही राणे यांनी दिला.
मोदी @९ महाजनसंपर्क अभियानाचा लेखा जोखा मांडण्यासाठी राजापूरातील राजापूर हायस्कुलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या जाहिर सभेत राणे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आ. आशिष शेलार, अभियान राज्य प्रभारी आ. प्रवीण दरेकर, आ. नितेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, प्रदेश उपाध्यक्ष अतुल कालेसेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार बाळ माने, राजापूर विधानसभा प्रभारी उल्का विश्वासराव, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, महिला आघाडीच्या ऐश्वर्या जठार, संध्या तेरसे, प्रदेश महिला सरचिटणीस सौ. शील्पा मराठे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुका अध्यक्ष अभिजीत गुरव जिल्हाध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ. शृती ताम्हनकर, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना राणे यांनी गेल्या 9 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी काय योगदान दिले याचा लेखा जोखा मांडला. देशासाठी 18 तास 20 तास काम करणारे नेतृत्व आपल्याला लाभलेले आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देश महासतेकडे वाटचाल करत आहेत. जगात एक प्रगतशील देश म्हणून भारत नावारूपाला आला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत आपण आज पाचव्या स्थानावर आलो आहोत, पुढील काही वर्षात आपण तिसऱ्या स्थानावर असु. आज भारताच्या पंतप्रधानांना जगात गौरविले जात आहे, अमेरिका सारख्या महासत्ता असलेल्या देशाकडून आपल्या पंतप्रधानांचा गौरव केला जातो, जगात आज भारताचा दबदबा आणि दरारा मोदींनी निर्माण केला आहे. भारताच्या पंतप्रधानांचा जगात होणारा सन्मान आणि गौरव हा आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकाचा गौरव आहे. त्यामुळे आपण सगळयांनी आता जोमाने काम केले पाहिजे असे राणे यांनी सांगितले.
सन 2019 मध्ये भाजपाने 303 जागांवर विजय मिळवाल. आपण 144 जागांवर आपला पराभव झाला. 303 तर जिंकायच्याच आहेत पण ज्या 144 जागांवर आपला पराभव झाला त्यातील निम्म्या जागा आपल्याला यावेळी जिंकायच्या आहेत हे लक्षात ठेवा. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम आणि कार्य घराघरात पोहचवा असे आवाहन राणे यांनी केले.
केंद्र सरकारच्या माध्यमातुन राज्यात विविध योजना आणि मोठया प्रमाणावर निधी येत आहे, त्याचा योग्य विनियोग करा, योजना घराघरात पोहचवा आणि मतदार वाढवा असे आवाहन राणे यांनी यावेळी केले.
आपल्याला आपला हक्काचा खासदार, आमदार निवडून आणायचा आहे, त्यासाठी कामाला लागा, घराघरात पक्ष संघटना आणि पंतप्रधानांचे काम पोहचवा असे आवाहन करतानाच तुमचा विश्वास घेऊन मी दिल्लीत जाणार आहे. त्यामुळे एक दिलाने काम करा, अंतर्गत मतभेद विसरा आणि केवळ मोदींसाठी आणि पक्षासाठी एकनिष्ठपणे काम करा.
कार्यकर्त्यामध्ये रग हवी, निष्ठा हवी आणि त्याला बुध्दीची जोड हवी. त्या बुध्दीच्या जोरावर काम करा आणि पक्ष वाढवा मी तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाही राणे यांनी यावेळी दिली.
आपल्या भाषणात राणे यांनी उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. अडीज वर्ष मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे यांनी काहीच काम केले नाही, मात्र सत्ता जाताच आत्ता हे टिका करत आहेत. नेंभळट आणि कतृव्य शून असा हा माणूस असल्याचा घणाघात करतानाच राणे यांनी रमेश मोरे आणि जया जाधव यांची हत्या कुणी आणि का केली हे उध्दव ठाकरे यांनी जाहिर करावे असे खुले आव्हान यावेळी दिले.
तर शिंदेवर टिका करणाऱ्या आदित्य ठाकरेंची पात्रता काय?असा खडा सवाल उपस्थित करून सुशांत राजपुत, दिशा सालियान यांचा खून झालेला असून लवकरच या मंडळींची जागा तुरूंगात असेल असा ईशाराही राणे यांनी यावेळी दिला.
ज्यांना स्वताचे अस्तीत्व नाही, कपडे कोणते आणि कसे घालावेत ते माहीत नाही त्या उध्दव ठाकरेंनी विकासाच्या गप्पा मारणे हास्यास्पद असल्याचे राणे म्हणाले, यांना जीडीपी म्हणजे काय हे माहित नाही ते राज्याचे नेतृत्व करत होते असा टोलाही राणे यांनी लगावला. बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र एवढीच यांची ओळख असून कर्तव्य शून्य नेंभळट माणूस म्हणजे उध्दव ठाकरे अशीही टीकाही राणे यांनी केली. मात्र बाळासाहेब ठाकरे हे एकमेव होते, आपले ते गुरू आहेत त्यांनीच आपल्याला घडवलं असेही राणे यांनी यावेळी सांगितले.
दहावी नापास विनाकय राऊतची मोदींवर टिका करण्याची लायकी तरी आहे काय असा खडा सवाल उपस्थित करून निष्क्रीय असलेला हा खासदार असल्याची टीका राणे यांनी केली.
उध्दव, आदित्य आणि संजय राऊतसाठी जेलचे दरवाजे उघडे आहेत
सध्या काहीच काम नसलेली उध्दव ठाकरे, त्यांचे पिल्लू आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे टिका करण्याचे काम करत आहेत. मात्र सत्तेचा वापर खून करण्यासाठी हत्या करण्यासाठी करणाऱ्या ठाकरेंसह राऊतांसाठी जेलचे दरवाजे उघडे आहेत लवकरच ही मंडळी जेलमध्ये असतील असा सूचक ईशाराही राणे यांनी यावेळी दिला. राऊत तर जामिनावर आहे त्याला त्याचा विसर पडला आहे, मात्र लवकरच तो जेलमध्ये असेल असेही राणे म्हणाले.
खोके सरकार म्हणणारे खोके खाऊनच मातोश्रीचे बोके झाले
एकनाथ शिंदे यांना खोकेवाले आणि खोके सरकार म्हणनारे उदध्व ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेच खोके घेऊन आणि ते खाऊन बोके झाले आहेत. बेस्टचा अध्यक्ष ते राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करताना किती आणि मातोश्रीच्या कुठल्या मजल्यावर खोके दिले ते जाहिर करू का?असा खडा सवाल राणे यांनी केला आहे. शिंदेकडूनही भरपूर खोके खाल्लेले आहेत. मात्र शिंदे हे संयमी नेते आहेत म्हणून ते गप्प आहेत. मात्र मला तोंड उघडायला लावू नका अन्यथा सोडणार नाही असा ईशारा राणे यांनी यावेळी दिला.
राजापुरातील ग्रीन रिफायनरी प्रकल्प मार्गी लागणार
राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असल्याचे राणे यांनी सांगितले. याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांसोबत आपली चर्चाही झालेली आहे. दोन लाख कोटींची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पातुन अनेकांना रोजगार मिळणार असून देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प होणारच असेही राणे यांनी सांगितले.
कायमच कोणताही प्रकल्प असो त्याला विरोध करायचा हीच उध्दव ठाकरे आणि त्यांच्या चेल्यांची पध्दत आहे. नुकतेच ते रिफायनरी विरोधासाठी राजापुरात येऊन गेले .मात्र ते विरोधासाठी आले होते की किती मिळणार पहाण्यासाठी आले होते अशी खोचक टिका राणे यांनी केली. यांनीच बारसूसाठी पत्र दिले आणि हेच विरोध करतायत यावरून यांची दुटप्पी भूमिका जतसेमोर आल्याचे राणे यांनी सांगितले.
शिवसेना संपवून संजय राऊतांनी शरद पवारांना दिलेला शब्दा पाळला
आज शिवसेनेची उ. बा. ठाकरे गटाची व उध्दव ठाकरे यांची जी अवस्था आहे त्याला खुद्द उध्दव ठाकरे कारणीभूत आहेत. संजय राऊत यांनी शरद पवारांना दिलेला शब्द पाळला आहे. कारण त्यांनी शिवसेना संपवली आहे. तसा शब्द राऊत यांनी पवारांना दिला होता. तो त्यांनी पुर्ण केला आहे. अशी टीकाही राणे यांनी केली. त्याच शरद पवारांच्या बाजुला ठाकरे बसतात. पाटण्यात तर यांना मेहबुबा यांच्या बाजुला कोपऱ्यात बसवून त्यांची जागा दाखवून देण्यात आली. एवढा अपमान बाळासाहेब असताना कधीच झाला नव्हता असेही राणे म्हणाले. मेहबुबा यांच्या बाजुला बसताना तीथे महिला आहेत असे सांगूनही ठाकरे तेथे बसले, ते महिला म्हणून बसले की काय ते मला माहित नाही अशी टीप्पणीही राणे यांनी केली.
बाळासाहेबांच्या मातोश्रीवर सगळे यायाचे आता मात्र उलटं झाले
यापुर्वी सगळे नेते मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीला यायचे आशीर्वाद घ्यालया यायचे. बैठका व्हायच्या चर्चा व्हायची. मात्र उध्दव ठाकरे यांनी ही सगळी पत घालवली. आज उध्दव ठाकरे इतके लाचार झाले आहेत की तेच सोनीया गांधी, शरद पवार ते पार पाटण्यापर्यंत अनेकांचे हुंबरे झीजवत आहेत यासारखे दुदैव नाही. ही वेळ का आली याचे आत्मपरिक्षण करायचे सोडून ते भाजपा व नेत्यांवर टिका करत आहेत. मात्र यापुढे आंम्ही ते खपवून घेणार नाही असा ईशारा राणे यांनी दिला.
प्रास्ताविक भाजपाचे मोदी @९ महाजनसंपर्क अभियानाचे सहसंयोजक प्रमोद जठार यांनी केले. या अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्हयातील कामाचा आढावा दीपक पटवर्धन यांनी तर सिंधुदुर्गतील आढावा राजन तेली यांनी घेतला. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या वतीने मान्यवरांचे पुष्पहार घालुन स्वागत करण्यात आले. आभार उल्का विश्वासराव यांनी मानले.