हौशी रेल्वे प्रेमीचा २३ वा प्रवास

रत्नागिरी | प्रतिनिधी : कोकण रेल्वे मार्गावरील १९९६ सालापासून आज पर्यंत रत्नागिरीतून गेलेल्या २२ गाड्यांचा पहिला व्यावसायिक प्रवास करणारे निवृत्त प्राध्यापक उदय बोडस या वेळी बुधवारी वंदे भारत एक्स्प्रेस चा पहिला व्यावसायिक प्रवास करणार आहेत.

३ जून रोजी वंदे भारत एक्स्प्रेस च्या उद्घाटन फेरीच्या प्रवासाला आवश्यक तो पास त्यांनी मिळवला होता पण दुर्दैवाने सोहळा रद्द करण्यात आला.आता मंगळवार २७ रोजी होणाऱ्या सोहळ्यात सहभागी न होता उदय बोडस हे आपली पत्नी सौ.साधनासह बुधवार दिनांक २८ रोजी रत्नागिरी – मडगाव प्रवास करणार आहेत

व्यावसायिक उद्घाटन फेरीच्या २३ व्या प्रवासाचे तिकीट २१०० पेक्षा जास्त असून पहिल्या ३ मिनिटात ५३० पैकी १४१ तिकीटे आरक्षित करण्यात आली आहेत