रिक्षा सेना चालक-मालक संघटना राजापूरची निवेदनाद्वारे मागणी
राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्याच्या एकुणच प्रतिकुल भौगोलिक रचनेमुळे रिक्षा व्यवसाय संकटात आला असे असताना शासनाच्या मुक्त रिक्षा परवाना धोरणामुळे राजापूरात रिक्षा थांबे मंजूर होताना अडचणी येत आहेत. त्यातून नवे व जुने रिक्षा व्यवसायिक यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असून त्यातून कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने शासनाने रिक्षांसाठी दिले जाणारे परवाने बंद करण्यात यावेत अशी मागणी राजापूर तालुका रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत परिवहन आयुक्त मुंबई यांना अग्रेशीत करण्यात आलेले लेखी निवेदन बुधवारी सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी श्री. ताम्हणकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. यावेळी रत्नागिरी रिक्षा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कदम, जिल्हा संघटना नेते नितीन तळेकर, सलील डाफळे, राजापूर तालुका अध्यक्ष संजय पवार तसेच राजापूर शहर व तालुक्यातील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
राजापूरातील रिक्षा व्यवसायाबाबत श्री. ताम्हणकर यांच्याशी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. याबाबतचा अहवाल आपण वरिष्ठ कार्यालयाला पाठवून नवीन मुक्त रिक्षा परवाने त्वरित बंद करण्यासाठी शिफारस करावी अशी मागणी करण्यात आली. त्यावर श्री. ताम्हणकर यांनी आपण हा अहवाल त्वरित शासनाला पाठवून या बाबत लागणारे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
आता नोंदणीकृत असलेल्या रिक्षा उभ्या करण्यासाठी थांबे अपुरे आहेत. येथील विशेषतः राजापूर शहरात भौगोलिक परिस्थिती मुळे रिक्षा थांबे मंजूर होताना अडचणी येत आहेत. रिक्षा व्यवसाय आधीच डळमळीत झालेला असल्याने नवीन व्यावसायिक यांमध्ये नेहमी वाद होत असतात. त्या मुळे कायदा सुव्यस्था बिघडण्याची शक्यता घडू शकते. त्यामुळे शासनाने मुक्त परवाने देणे बंद करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी कोंडये स्टँड चे अध्यक्ष दत्तात्रेय तळवडेकर, सचिव विनायक बेंदूकडे, सुर्यकांत तेरवणकर, जयराम ढिपळे, प्रकाश कुंदरकर, अनिकेत इंगळे, संतोष ढिपळे, संदीप सोगम, पाचल स्टॅन्ड चे अध्यक्ष जयंत धावडे, सचिव विलास जाधव ओणी स्टॅन्ड चे अध्यक्ष सुहास लिंगायत , सचिव नवनीत मोनये, गणपत रहाटे, योगेश गुरव, रामचंद्र भांबळे , सुरज भांबळे , अक्षय पांचाळ, हर्षद निमणकर, वाटूळ स्टॅन्ड चे अध्यक्ष स्वप्निल चव्हाण, कृष्णा चव्हाण नयन चव्हाण, नंदकुमार नलावडे, मंदार चव्हाण , योगेश वाळुंज, जयंत चव्हाण संतोष भुर्के, खरवते स्टॅन्ड चे विनायक चौगुले, प्रदीप खाडे, भु स्टॅन्ड चे महेश्वर खेर, भास्कर खानविलकर, शब्बीर याहू धारतळे स्टॅन्ड चे प्रसाद भोसले राजापूर शहरातील शिवाजी पथ स्टॅन्ड शरद आडविलकर, दत्तात्रय मोसमकर रतीष करगुटकर, प्रकाश मोंडे, प्रथमेश खांबळ पिंपळ महापूरुष स्टॅन्ड अध्यक्ष अमित कांबळी, बाळू दुधवडकर, धुतपापेश्वर रिक्षा स्टॅन्ड ऋषी इंदुलकर, राजन गुरव , वैभव घाडी ,प्रवीण कातलकर राजापूर रिक्षा सेना चालक-मालक संघटना अध्यक्ष संजय पवार सचिव पराग चिंबुलकर सहसचिव संतोष गोंडाळ, संदिल इंदुलकर खजिनदार धनंजय पाथरे आणि संतोष मांजरेकर इत्यादी लोक उपस्थित होते.













