रत्नागिरी ः प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा तिठा येथून डंपर चोरल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 ते सोमवार 4 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 3 वा.कालावधीत घडली आहे.
याबाबत डंपर मालक मोहाफिज रियाजअहमद टंकसाली (20,रा.मुळ रा.चिकोडी-बेळगाव,कर्नाटक) याने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, 3 ऑगस्ट रोजी डंपर चालक यासिन ताजुद्दीन याने फिर्यादीच्या मालकीचा डंपर (केए-22-सी-4089) हा हातखंबा तिठा येथील सिध्दगिरी मंगल कार्यालय एम.एम.टि.लॉजिस्टिक्स कंपनी येथे रिकामा उभा करुन ठेवला होता. 4 ऑगस्ट रोजी डंपर चालक यासिन डंपर पार्क केलेल्या ठिकाणी गेला असता त्याठिकाणी त्याला डंपर दिसून आला नाही. त्याने आजुबाजुला शोध घेतल्यावर डंपर चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आले. डंपरचा इतर ठिकाणी शोध घेउन अखेर गुरुवार 7 ऑगस्ट रोजी डंपर मालकाने ग्राीमण पोलिस ठाण्यात डंपर चोरीला गेल्याची तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.











