गावखडी /वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत आज बहीण भावाचे अतूट नाते असणारा रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .या रक्षाबंधन सणातून आज झाडे लावा ,झाडे जगवा, पर्यावरणाचा समतोल राखा असा पर्यावरणाचा संदेश ,जनजागृती करण्यात आली.याप्रसंगी जि.प.मेर्वी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शर्वरी करगुटकर ,उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर, पदवीधर शिक्षक आनंद सावंत, उपशिक्षिका संजया पावसकर, शिक्षिका ऐश्वर्या गुरव, शालेय मुख्यमंत्री मैत्रेयी अभ्यंकर उपमुख्यमंत्री रचित म्हादये आणि सर्व विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली होती.
हिंदू धर्मामध्ये पवित्र सर्वश्रेष्ठ पवित्र मानला जाणारा बहीण भावाचे अतूट नाते जपणारा रक्षाबंधन सण जिल्हा परिषद मेर्वी शाळेत शाळेतील मुलींनी मुलांना आरती ओवाळून , हातात राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. तसेच हा सण मर्यादित स्वरूपात न ठेवता जिल्हा परिषद मेर्वी शाळेने सध्या पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे ,पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी नवीन उपक्रम आयोजित केला तो उपक्रम म्हणजेच झाडांना आरती ओवाळून त्यांची पूजा करून झाडांना राखी बांधण्यात आली .ही राखी बांधण्याचा उद्देश वृक्ष संवर्धन करणे काळाची गरज आहे असा संदेश ,असे संस्कार देशाची भावी पिढी असणारे जिल्हा परिषद मेर्वी शाळेचे विद्यार्थी यांच्या मनावर रुजवण्यात आले आणि मेर्वी पंचक्रोशीत वृक्षांचे महत्त्व पटवून देण्यात आले .
हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी जि.प.मेर्वी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शर्वरी करगुटकर ,उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर, उपशिक्षिका संजया पावसकर, ऐश्वर्या गुरव, पदवीधर शिक्षक आनंद सावंत आदिंनी बहुमोल परिश्रम घेतले आहेत.
या उपक्रमांबद्दल मेर्वी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.मंगेश म्हादये आणि सर्व पदाधिकारी ,ग्रामस्थ पालक यांच्याकडून कौतुक केले जात आहे.
फोटो = जि.प.पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेच्या वतीने वृक्षांना राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला आहे याप्रसंगी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी करगुटकर उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर आणि शिक्षकवृंद
छाया =दिनेश पेटकर गावखडी











