लांजा ( प्रतिनिधी) तालुक्यातील गोविळ गुरवगाव येथून ६५ वर्षीय महिला बेपत्ता झाली असून ती बेपत्ता झाल्याची फिर्याद आज लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे..
रमेश सिताराम गुरव ( वय ४२, राहणार गोविळ गुरव गाव) यांनी याबाबतची फिर्याद लांजा पोलीस ठाण्यात केली आहे. त्यांची आई सरिता सिताराम गुरव (६५) हिला घरातून कोणालाही न सांगता पाहुण्यांकडे जाण्याची सवय आहे. यापूर्वी देखील ती दोन वेळा अशाच प्रकारे घरात कोणालाही न सांगता निघून गेली होती.
रमेश गुरव यांची पत्नी आणि आई सरिता गुरव यांच्यात दिनांक २० एप्रिल रोजी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते त्यानंतर सकाळी ११.०० वाजण्याच्या दरम्याने सरिता गुरव या कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या. त्यानंतर रमेश गुरव व अन्य यांनी सरिता गुरव यांचा नातेवाईक, गावात व अन्य ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांचा कोठेही ठाव ठिकाण न लागल्याने ती बेपत्ता झाल्याची फिर्याद लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल उर्मिला शेडे या करीत आहेत











