रत्नागिरीत फर्निचर दुकानाच्या आडोशाला लपलेला संशयित, हत्यारासह पकडला

रत्नागिरी ः प्रतिनिधी

शहरातील एका फर्निचर दुकानाच्या आडोशाला स्वतःचे अस्तित्व लपवत हत्यार बाळगणार्‍या विरोधात शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार 7 ऑगस्ट रोजी रात्री 11.45 वा. सुमारास करण्यात आली.

कमलेश कुमार थापा (42,रा.नेपाळ) असे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस काँस्टेबल अमित पालवे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,गुरुवारी रात्री संशयित हा अंधाराचा फायदा घेत आपल्या ताब्यात हत्यार बाळगून गुन्हा करण्याच्या इराद्याने लपून बसलेला शहर पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे त्याच्या विरोधात महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 122(अ) प्रमाणे सरकारतर्फे कायदेशिर फिर्याद देण्यात आली आहे.