रत्नागिरी – जिल्ह्यात आज, दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी ४९.२९ मिमी इतक्या एकूण पावसाची नोंद झाली असून, सरासरी पाऊस ५.४७ मिमी इतका झाला आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी पडलेल्या पावसाचे तपशील पुढीलप्रमाणे:
– *मंडणगड* – 2.2 मिमी
– *खेड* – 8.28 मिमी
– *दापोली* – 7.57 मिमी
– *चिपळूण* – 6.22 मिमी
– *गुहागर* – 1.2 मिमी
– *संगमेश्वर* – 13.00 मिमी
– *रत्नागिरी* – 7.77 मिमी
– *लांजा* – 1.80 मिमी
– *राजापूर* – 1.25 मिमी
जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या, तर संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक १३ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर काहीसा कमी असून, हवामान विभागाकडून पुढील काही दिवस मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.











