जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा शिरगाव मराठी येथे रक्षाबंधन उत्साहात 

गावखडी/वार्ताहर 

जि.प.पुण प्राथमिक केंद्रशाळा शिरगाव मराठी येथे विदयार्थीमध्ये समता,बंधुता श्रमप्रतिष्ठा,स्त्रीपुरुष समानता, स्व ची जाणीव,नातेसंबंध इ. मानवी मूल्यांची जोपासना करण्याच्या उद्देशाने रक्षाबंधन हा उपक्रम अनोख्या पद्धतीने घेण्यात आला.

यासाठी सर्व विद्यार्थ्यांकडून राख्या तयार करून घेण्यात आल्या. प्रत्यक्ष रक्षाबंधनाच्या दिवशी मुलींनी मुलांना तसेच मुलांनी मुलींनासुद्धा राख्या बांधल्या. या आगळ्यावेगळ्या पद्धतीने उपक्रमाच्या कार्यवाहीची संकल्पना पदवीधर शिक्षिका सौ.नीलिमा इंदुलकर यांनी स्पष्ट केली.

उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सौ.मोहिते,सौ.धामापुरकर,सौ गोरे यांनी मेहनत घेतली.