विधान विठ्ठल धुरी वय 14 वर्षे इयत्ता नववी वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला शाळेचा विद्यार्थी सिंधुसागर तलाव वेंगुर्ला येथे गेल्या पाच वर्षां पासून प्रशिक्षक दीपक सावंत यांच्या मार्गदर्शन खाली जलतरण चे प्रशिक्षण घेत आहे.. यापूर्वी राज्य स्तरीय स्पर्धेत उत्तम प्रकारे आपली कामगिरी इचलकरंजी, कोल्हापूर, पुणे याठिकाणी केलेली होती… आता त्याची पुढील जलतरण सराव करिता पुणे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा प्रबोधिनी येथे निवड झाल्याने वेंगुर्ला तसेच सिंधुदुर्ग वासियां मार्फत कौतुक केले जात आहे.
या संपूर्ण प्रवासात त्याच्या प्रशिक्षक,
वेंगुर्ला
नगर परिषद आई वडील यांचे महत्वाचे योगदान आहे. त्याचे आई वडील दोन्ही सुध्दा सिंधुदुर्ग पोलीस सेवेत कार्यरत आहेत. विशेष करून त्याच्या आईचे (दीपा विठ्ठल धुरी)योगदान
आता पर्यंतच्या प्रवासात खूपच आहे. पोलीस दला तील आपल्या धकाधकीच्या कामातून सुद्धा आपल्या मुलाच्या क्रिडा गुणांना वाव देण्या साठी त्यांनी केलेली धडपड सुद्धा तेवढीच प्रशंसनीय आहे.












