खेड(प्रतिनिधी) मुंबई – गोवा महामार्गावर भरणे नाका या ठिकाणी पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व्हिस रोडवर पाणी साचले जात असून चिखलामुळे वाहन चालकांची तारांबळ उडत आहे. यामुळे येथील रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे
महामार्ग चौपदरीकरण कामाचा ठेका असलेल्या कंपनीने गेल्यांकाही महिन्यापासून या भागात पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने ही स्थिती उद्भवली असून नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
मुंबई – गोवा महामार्गावर भरणे येथे सर्व्हिस रोडवर पावसाचे पाणी निचरा होण्याची व्यवस्था नसल्याने पाणी साचत आहे. परिणामी त्यातून मार्ग काढताना पादचारी, दुचाकी स्वार, लहान मोटार चालक यांची दमछाक होत आहे.
भरणे येथे सतत वर्दळ असलेल्या भागात पहिल्याच मुसळधार पावसात पाणी साचल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. जात आहे या परिसरात रस्त्यालगत बाजूपट्टी नसून त्या जागी थेट गटार व मातीचा ढीग असल्याने पावसाच्या पाण्याने या परिसरात चिखल पसरला आहे. या परिस्थितीतमुळे या भागात अपघात होण्याची भीती व्यक्त होत असून राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने नेमलेल्या चौपदरीकणाच्या कामाच्या ठेकेदाराने याकडे तत्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.