कसाल ग्रामपंचायत च्या वतीने हर घर तिरंगा जनजागृती फेरी 

कसाल बाजारपेठ व हायस्कूल दरम्यान राबविण्यात आली स्वच्छता मोहीम 

कुडाळ :कसाल ग्रामपंचायतच्या वतीने हर घर तिरंगा अंतर्गत ग्रामपंचायत कसाल च्या वतीने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत उघड्यावर दिसणारा प्लास्टिक कचरा संकलन करणे हा कार्यक्रम कसाल हायस्कूल विद्यार्थी व ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका अशा सेविका ग्रामपंचायत सर्व कर्मचारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांसाठी सरपंच राजन परब यांनी स्वच्छते बद्दल मार्गदर्शन केले. आपण स्वतः स्वच्छता पाळली तर घरातील स्वच्छता होईल त्याचबरोबर आपला गाव सुद्धा स्वच्छ करता येईल. तसेच या मोहिमेमध्ये गावातील सर्व ग्रामस्थांनी आपलं घर स्वच्छ ठेवलं पाहिजे तसेच बाजारामध्ये असणारे व्यापारी यांनी आपलं दुकान तसेच दुकानासमोरील सर्व परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. त्याचप्रमाणे गावात जर प्लास्टिकचा वापर दुकानात होत असेल तर त्यांना पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल याची लवकरच ग्रामपंचायत मार्फत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच श्री परब यांनी यावेळी दिली. उघड्यावर जे ग्रामस्थ कचरा टाकतात त्या ठिकाणी ग्रामपंचायत वतीने लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहेत. जो ग्रामस्थ कचरा टाकील त्याला एक हजार रुपये दंड आणि जो ग्रामस्थ कचरा टाकताना चा फोटो ग्रामपंचायत मध्ये देणार त्याला त्याला पाचशे रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. त्यामुळे गावातील सर्व ग्रामस्थ कोणीही घरातील कचरा तसेच दुकानातील कचरा रस्त्यावर टाकू नये याबाबत सूचना देण्यात आल्या. कार्यक्रमाला ग्रामस्थ विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित राहून सहकार्य केल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.