रेडी येथील द्विभुज गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी..

अंगारकी संकष्टी योग असल्याने मंदिर परिसर भक्तांनी फुलला

वेंगुर्ले : दाजी नाईक 

रेडी येथील प्रसिद्ध द्विभुज गणपती मंदिरात आज अंगारकी संकष्टी निमित्त देवाच्या दर्शनासाठी सकाळ पासून भाविकांनी गर्दी केली होती. अंगारकी संकष्टी योग असल्याने मंदिर परिसरात भक्तांकडून सुरू असलेल्या गणपतीच्या जय जय काराने वातावरण फुलून गेले होते.

मंदिरात सकाळी नित्य पूजा आर्चा झाल्या नंतर देवदर्शनासाठी सुरुवात झाली. गणपती ला आवडणारे लाल फुल, दुर्वा, मोदक अगरबत्ती घेऊन भाविक गणपतीचे मनोभावे दर्शन घेत होते. भाविकांच्या सोईसाठी देवस्थान कडून भाविकांच्या रांगेसाठी व्यवस्था केली होती. त्यामुळे सर्वांना व्यवस्थित दर्शन होत होते. मंदिर परिसरात पूजा साहित्य व अन्य दुकानेही सजली होती. सायंकाळ पर्यंत भाविकांची ये जा सुरू होती.