हिंदू जनजागृती समितीचे क्रांति गाथा प्रदर्शन

चिपळूण (प्रतिनिधी) : परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या यूनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरूदक्षिणा सभागृहात तसेच न्यू इंग्लिश स्कूल, तिवरे येथे क्रांति गाथा प्रदर्शनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. विविध इयत्तेतील शेकडो विद्यार्थी आणि शिक्षक यांनी याचा लाभ घेतला. शिक्षक वर्गाने या प्रदर्शना बद्दल हिंदू जनजागृती समितीचे आभार व्यक्त केले.
क्रांतिकारक यांच्यामुळे आम्ही येथे मुक्तपणे जगत आहोत याची जाणीव झाली. यांच्याप्रमाणे आपणही देशासाठी कार्य करावे ही प्रेरणा या प्रदर्शनातून मिळाल्याचे मनोगत विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले. स्वातंत्र्य दिना निमित्ताने हिंदू जनजागृती समितीच्या वतीने विद्यार्थी आणि युवक यांच्या मनात स्वातंत्र्याचे मोल लक्षात यावे व ते मिळविण्यासाठी क्रांतिकारक यांनी केलेला त्याग याबद्दलची कृतज्ञता निर्माण व्हावी, या उद्देशाने क्रांती गाथा प्रदर्शनाचे आयोजन विविध शाळा व महाविद्यालये येथे विनामूल्य करण्यात येते. या प्रदर्शनाद्वारे काही अपरिचित क्रांतिकारक यांच्या विषयी ही माहिती मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्र भक्ती निर्माण करण्याचे कार्य हिंदू जनजागृती समिती करत आहे, याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रदर्शनाच्या आयोजनात समितीचे जगदीशचंद्र यादव, सचिन सकपाळ, रविंद्र शिंदे, प्रभाकर खराडे, सनातन संस्थेचे ज्ञानदेव पाटील आदींनी सहभाग घेतला.
फोटो फाईल- सीपीएन१३-५
युनायटेड इंग्लिश स्कूल येथे प्रदर्शन पाहताना विद्यार्थी आणि शिक्षक.