जिल्हास्तरीय ‘सिकाई मार्शल आर्ट’ स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल आजरा या प्रशालेचे सुयश.
आचरा-अर्जुन बापर्डेकर
कणकवली या ठिकाणी संपन्न झालेल्या 14 वर्षाखालील जिल्हास्तरीय ‘सिकाई मार्शल आर्ट’ स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल आचरा या प्रशालेचा विद्यार्थी कुमार आविष्कार अमोल म्हामाने यांने उज्वल यश संपादन केले असून, विभागीय स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या त्याच्या उज्ज्वल यशाबद्दल सर्व संस्था चालक व प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. घुटुकडे सर तसेच सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून विभागीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.











