संतोषभाई मेहता इंग्लिश मिडियम स्कूल दापोली मध्ये गोकुळाष्टमी उत्साहात साजरी…

दापोली l प्रतिनिधी-* संतोषभाई मेहता इंग्लिश मिडियम स्कूल दापोलीमध्ये गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने व श्रीकृष्णाच्या पूजनाने झाली.त्यानंतर शाळेच्या शिक्षिकांनी पाळणा गायला.इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनीनीं सुंदर वेशभूषेत मनमोहक नृत्य सादर केले.इयत्ता 5 वी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित लघुनाटिका सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.

इयत्ता 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी हंडीभोवती फेर धरून नृत्य केले व हंडी फोडण्यात आली.कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते मुलींची हंडी. संपूर्ण शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. गोकुळाष्टमीचे महत्त्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमासाठी ज्ञानदीप दापोलीच्या अध्यक्षा सरोज मेहता व सेक्रेटरी सुजय मेहता यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.पूजा पाटोळे व श्री.विश्वास नाईकवाडी यांनी केले.हा कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका चंदाली पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली जल्लोषात पार पडला.यावेळी पालक प्रतिनिधी उपस्थित होते.शेवटी सर्वांना प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.