देवगड (प्रतिनिधी)देवगड तालुक्यातील फणसे समुद्रकिनाऱ्यावर शीर नसलेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना शनिवारी सकाळी सुमारे आठ वाजताच्या सुमारास स्थानिकांच्या निदर्शनास आली.
मृतदेह पुरुष जातीतील असून, त्याच्या अंगावर आकाशी रंगाचा टी-शर्ट आणि क्रीम रंगाची हाफ पँट आढळून आली आहे. मात्र, मृतदेहाला शीर नसल्यामुळे त्याची ओळख पटविणे कठीण ठरत आहे. या व्यक्तीचे वय सुमारे 45 वर्ष असावे
स्थानिकांनी याबाबतची माहिती देवगड पोलीस ठाण्यास कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल आशिष कदम आणि भाऊ नाटेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला व पंचनामा केला.










