गावखडी / वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत आज गोपाळकाला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत गोपाळकाला निमित्त इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांनी “गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्ह्य बाळा “असे म्हणत टाळ मृदुंगा च्या गजरात भक्तिमय वातावरणात विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली.
या प्रसंगी जि.प.मेर्वी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शर्वरी करगुटकर ,उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर ,पदवीधर शिक्षक श्री. आनंद सावंत, उपशिक्षिका संजया पावसकर ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.मंगेश म्हादये , श्री.सिद्धार्थ पावसकर,श्री.पियुष बेंद्रे, श्री.विघ्नेश गोठणकर, श्री.निहार म्हादये ,सौ.चित्रा हातणकर आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली होती.
या गोपाळकाला उपक्रमांतर्गत “श्रीकृष्ण भूमिका “कु.ओम चंदूरकर आणि” राधा भूमिका” कु.सानवी कुरतडकर यांनी अतिशय छान सादरीकरण करण्यात आली.
हा उपक्रम अतिशय यशस्वीपणे पार पडण्यासाठी मेर्वी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शर्वरी करगुटकर, उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर, उपशिक्षिका संजया पावसकर, पदवीधर शिक्षक आनंद सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.मंगेश म्हादये , सिद्धार्थ पावसकर,श्री. पियुष बेंद्रे , श्री.विघ्नेश गोठणकर, श्री.निहार म्हादये ,शाळा व्यवस्थापन समितीच्या माजी सदस्या क्रांती कुरतडकर आदींनी बहुमोल परिश्रम घेतले .
Home ताज्या घडामोडी जि.प.पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत “गोविंदा रे गोपाळा ” जयघोषात...











