स्त्री रोग तज्ञ डॉ. विनोद सांगवीकर तातडीने जिल्हा रुग्णालयात होणार रुजू

शासनाच्या आरोग्य विभागाने काढले आदेश 
माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली माहिती

रत्नागिरी । प्रतिनिधी : रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालय हे अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. त्यातही पुरेसे वैद्यकीय अधिकारीच नसणे ही गेले अनेक वर्षांची समस्या आहे. गेली काही वर्षे जिल्हा रुग्णालयात कार्यरत स्त्री रोग तज्ञ डॉ. विनोद सांगवीकर यांची बदली झाल्याने स्त्री रोग व प्रसूती तज्ञांची उणीव मोठ्या प्रमाणावर रुग्णालयाला भासू लागली होती. डॉ.सांगवीकर यांनाच पुन्हा जिल्हा रुग्णालयात रुजू करावे अशी जनतेमधून मोठ्या प्रमाणावर मागणी होत होती.

याची दखल राज्य शासनाकडून घेण्यात आली असून डॉ. सांगवीकर यांची पालघर येथून तात्पुरत्या कालावधीसाठी जिल्हा रुग्णालयात येथे नेमणूक केल्याचे आदेश आरोग्य विभागाने काढल्याचे पत्र माजी आमदार प्रमोद जठार यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील स्त्री रोग तज्ञांचा प्रश्न काही कालावधीकरता का होईना मार्गी लागला आहे.