मंडणगड : प्रतिनिधी, – पंचायत समिती मंडणगड यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत कुंबळे येथे उभ्या करण्यात आलेल्या तालुकास्तरीय पाल्स्टीक संकलन केंद्रांचे नुकतेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याहस्ते फित उद्घाटन करण्यात आले.
पर्यावरणीय बदलाच्या अनुषंगाने कोकणासारख्या इको सेन्सिटिव्ह झोन असलेल्या संवेदनशील प्रदेशात कमीत कमी प्लास्टिकचा वापर व्हावा आणि वापरात असलेले प्लास्टिक योग्य पद्धतीने संकलित व्हावे यासाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला जात आहे. याबद्दल तालुका प्रशासन आणि ग्रामपंचायतीचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमास शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई, दापोली तालुकाप्रमुख उन्मेष राजे, मंडणगड तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, माजी जि. प. समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, सरपंच सौ. ऐश्वर्या धाडवे, दापोली गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, मंडणगड गटविकास अधिकारी सुनील खरात, कुंबळे गावच्या सरपंच सौ. सानिका पाटील, उपसरपंच इशा दळवी, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील, अनिल लोखंडे, तन्वी महाजन, सुरया कुडूपकर, अकिला देवरुखकर, हरेश दळवी, ग्रामसेविका दीपिका गुळेकर आदि मान्यवर व ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी – कुंबळे येथे प्लास्टीक संकलन केंद्रांचे उद्घाटन करताना गृहराज्यमंत्री योगेश कदम व कार्यक्रमास उपस्थित मान्यवर.











