मुंबई :
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शिवार आंबेऱे (तालुका – रत्नागिरी)ग्रामविकास प्रतिष्ठानच्या मुंबईकरांचा पहिलाच स्नेहमिलन सोहळा दादर पश्चिम येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सभेला मुंबईकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहीले होते. विद्यार्थी व ग्रामस्थांना शिक्षण, नोकरी आणि व्यवसायातील संधी व गावचा विकास या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी कोकणभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.श्री.संजय यादवराव,व प्रबोधक युथ फेडरेशनचे अध्यक्ष मा.श्री.हर्षद माने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात मुंबईत कार्यरत असलेले गावातील व्यावसायिक, सेवापूर्ती झालेले ग्रामस्थ, शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवणारे विद्यार्थी तसेच कला, क्रिडा आणि इतर विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठवणाऱ्या नागरीकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
शिवार आंबेऱे ग्रामविकास प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने गावात शिक्षण घेणाऱ्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचा सत्कार राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने करण्यात आला. या समाजोपयोगी कार्यक्रमासाठी सढळ हाताने मदत करणाऱ्या देणगीदारांचे आभार मानताना मंडळाचे अध्यक्ष श्री.दिपक देऊ लाखण यांनी ग्रामस्थांनी मुंबईत राहत असताना जबाबदारीचे भान ठेवून गावच्या विकासासाठी पण आपले योगदान असेच चालू ठेवावे असे आवाहन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.भालचंद्र पारकर, जगदीश कदम, सुरेंद्र लाखण,संजय आंबेरकर व नितीन हातिसकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली.











