रत्नागिरी: कारवांचीवाडी येथील सेंट थॉमस स्कूलमध्ये शनिवारी दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. दहीहंडी साठी विद्यार्थीनी व विद्यार्थी असे दोन संघ तयार करण्यात आले होते. या दोन्हीही संघांनी दहीहंडीला दमदार अशी सलामी दिली व दहीहंडी फोडली. दहीहंडी निमित्त नृत्य सादरीकरण करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी दहीहंडीच्या उत्सवामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
यामध्ये शाळेचे व्यवस्थापक फादर थॉमस, शाळेचे प्रिन्सिपल फादर जॉर्ज, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्याना प्रोत्साहन दिले व सहभाग घेतला.











