अखंड कुणबी समाज पोसरे संघटनेचा उद्या प्रथम वर्धापन दिन

 

एड. रोशन पाटील करणार मार्गदर्शन

चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील अखंड कुणबी समाज संघटना पोसरे या संघटनेचा प्रथम वर्धापन दिन गुरुवार दिनांक 29 रोजी विठ्ठल रखुमाई मंदिर पोसरे वरचीवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी एड. रोशन पाटील मार्गदर्शन करणार आहेत.

चिपळूण तालुक्यातील पोसरे गाव येथे गतवर्षी कुणबी समाजातील बांधवांना एकत्रित करून एकीची वज्रमूठ तयार करण्यात आली . यास वज्रमूठीला अखंड कुणबी समाज पोसरे असे नामकरण देऊन सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले. याच संघटनेचा प्रथम वर्धापन दिन 29 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण मुलांचा गुणगौरव सोहळा सुद्धा संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला शिवराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष एड. रोशन पाटील व कुणबी युवा चिपळूण तालुका अध्यक्ष पत्रकार संतोष (भाई) कुळे हे उपस्थित राहणार आहेत.

अखंड कुणबी समाज संघटनाच्या वतीने एका वर्षात अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. विशेषतः शैक्षणिक आणि आरोग्य उपक्रमावरती या संघटनेने भर दिला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात मदत करण्याचे सुद्धा या संघटनेने दृष्टिकोन ठेवलेला आहे . या कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन अखंड समाज संघटना पोसरे अध्यक्ष सुरेश आदावडे व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.