गुहागर l प्रतिनिधी :गुहागर मनसेमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे.गुहागर शहरातील कार्यकर्त्यांनी नुकताच पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला.
गुहागर शहरामध्ये वॉर्ड.क्रमांक ३ आणि ४ च्या नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन व पक्षाचे गुहागर संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उप जिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनिल हळदणकर, यांच्या मार्गदर्शना खाली तसेच गुहागर शहराध्यक्ष अभिजित रायकर, तालुका सचिव प्रशांत साटले, मनविसे तालुकाध्यक्ष प्रथमेश रायकर यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी शहरातील विक्रांत सांगळे,संजय जोयशी, राजेश घोरपडे,दर्शन जांगळी,प्रशांत जांगळी,प्रणय जांगळी,विद्येश जांगळी,वेदांत जांगळी,सोहम घाणेकर, अजिंक्य सांगळे, अभिषेक जांगळी,करण जांगळी,विजय जांगळी,प्रतिक साटले,सुहास जांगळी, प्रसाद जांगळी ,अक्षय जोशी,ओंकार सांगळे,निशांत सांगळे,संदेश जांगळी,आकाश जांगळी,विजय घोरपडे,निनाद जांगळी,प्रमोद मस्कर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहिर प्रवेश केला.
यावेळी मनसेनेचे,शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष प्रसाद कुष्टे,असगोली गण तालुकाध्यक्ष अमित खांडेकर, गण शृंगारतळी तालुकाध्यक्ष जितेंन्द्र साळवी, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राहुल जाधव,माजी उप शहराध्यक्ष राजाभाऊ कदम, वॉर्ड अध्यक्ष दत्ताराम गिजे, गणेश गिजे,नंदकुमार जांगळी,मुंढर शाखाध्यक्ष सुजित गांधी, आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.












