माझ्या जिल्ह्याच्या भविष्याशी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिमेशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही

पालकमंत्री नितेश राणे यांचा अवैद्य व्यावसायिक आणि प्रशासनाला थेट इशारा

अनेक संसार उध्वस्त करून,युवकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरोधात मी उभा आहे!

मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिमा खराब करणाऱ्यांची मी गय करणार नाही

पोलिसांनी अवैध धंदे बंद करावेत नाहीतर मी करतो

“मटका, जुगार, ड्रग्स आणि वाळू माफियांना थारा नाही

“९ महिने पोलिसांना वेळ दिला, तरीही धंदे सुरू राहिले आता पालकमंत्री म्हणून मी धाड टाकणार 

*मी काल केलेली कारवाई ट्रेलर आहे, वेळ पडेल तर दर आठ दिवसांनी ब्रेकिंग न्यूज देणे

पालकमंत्री नितेश राणेंची मटका अड्ड्याच्या धाडीनंतर प्रशासनाला धारेवर धरणारी घेतली पत्रकार परिषद

 संतोष राऊळ (कणकवली);सिंधुदुर्गातील युवकांच्या भविष्याशी खेळणारे, अनेकांचे संसार उध्वस्त करणाऱ्या मटका-जुगार, ड्रग्स, दारू, अशा अवैध व्यवसायांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी थारा देणार नाही.प्रशासनाने अवैध धंदे बंद केले नाहीत तर मी स्वतः धाड टाकीन, प्रशासनातील सर्वच अधिकारी वाईट नाहीत अनेक अधिकारी प्रामाणिक आणि चांगलं काम करत आहे मात्र जिल्ह्यातील अवैध धंद्यांना जे पोलिस-महसूल अधिकारी पाठीशी घालत आहेत त्यांनासोडणार नाही. माझ्या जिल्ह्याच्या भविष्याशी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिमेशी खेळणाऱ्यांनाची गय केली जाणार नाही. असा स्पष्ट इशारा बंदरे आणि मत्स्य आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला. प्रहार भवन येथे मंत्री नितेश राणे यांनी अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्यांना खरमरीत इशारा देणारी पत्रकार परिषद घेतली.

पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, 18 जानेवारी 2025 रोजी पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. तेव्हापासून सिंधुदुर्ग पोलीस यंत्रणेसोबत झालेल्या प्रत्येक बैठकीत आदेश केले होती की मी पालकमंत्री असताना सिंधुदुर्गात कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे चालता नये. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिमेला डाग लागेल असा कोणताही प्रकार घडणार नाही याची जिल्हा पोलीस यंत्रणेने दक्षता घ्यावी असे स्पष्ट सांगितले होते असे पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. माझे नारायण राणेंचा मुलगा आहे. रानेसाहेबांनी जिल्ह्याचा पालकमंत्री मंत्री मुख्यमंत्री विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना अवैध धंद्यावाल्याना कधीच सोडलं नाही. सिंधुदुर्ग च्या युवा पिढीचे भविष्य जर अंमली पदार्थ, जुगार मुळे अंधारात जात असेल तर मी गप्प बसणार नाही.नारायण राणे साहेबांनी स्वतः जत्रेत सुरू असलेले जुगार आणि अवैध धंदे बंद केले होते. त्याच राणे साहेबांचा मी मुलगा आहे.राणे साहेबांच्या विचार सरणी वर चालणारा मी कार्यकर्ता आहे.याआधी दोन वेळा मी पोलीस अधिकाऱ्यांना अवैध धंदे, कुठे चालतात, कोण चालवतो, कोणता ऑफिसर कर्मचारी त्यांना सपोर्ट करतो याची माहिती मी पोलिसांना दिले होते. मी स्वतः पोलिसांना टीप दिली आहे आणि त्यांनतर पोलिसांनी रेड टाकली होती. मी 9 महिने पोलिसांना वेळ दिला. तरीही अवैध धंदे सुरूच होते. म्हणूनच मी काल कणकवलीत मटका किंगच्या बुकी अड्ड्यावर धाड टाकली. पोलीस माझी भीती दाखवून जुगार वाल्यांकडून आपला हफ्ता दुप्पट करून घेत असत.कालच्या घटनेमुळे मी काय करू शकतो हे समजलं असेल. पोलीस अथवा महसूल खाते असेल.. यापूढे जर कोणी अवैध धंद्यांना पाठबळ देत असेल तर हयगय करणार नाही. गांजा कुठून येतो, कोण विकतो हे पोलिसांना माहिती आहे. वाळू चोरी कशी होते ? वाळू चे रॅम्प कसे उभारतात हे मला माहिती आहे. राणे साहेबांचा मुलगा म्हणून पालकमंत्री असेपर्यंत मी माझ्या जिल्ह्यातील कोणाच्याही भविष्याशी खेळायचा कोणी प्रयत्न करत असेल तर हयगय करणार नाही. कणकवलीत टाकलेली धाड हा ट्रेलर होता. गोव्यातून येणारी अवैध दारू कशी येते, कुठे उतरते हे सगळं मला माहिती आहे. अवैध दारुवाल्यांशी कोणत्या पोलिसांचे लागेबांधे आहेत ते मला माहीत आहे. त्यामुळे माझ्या नादी लागू नका. मटका जुगार खेळणाऱ्यांचा आई वडिलांवर, त्या कुटुंबावर काय प्रसंग ओढवत असेल याचा विचार करायला हवा. एका बाजूने आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता रात्रंदिवस मेहनत घ्यायची आणि दुसरीकडे तुम्ही अवैध धंद्यातून पिढी बरबाद करायची हे चालणार नाही. जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती मी मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याशी बोललो आहे.मटका,जुगार, ड्रग्स,यांच्या सह वाळू माफियांच्या संबंधीत महसूल अधिकाऱ्यांना इशारा समजा. यापुढे वाळूचोरी सहन करणार नाही. माझ्या जिल्ह्याच्या भविष्याशी खेळणाऱ्यांविरोधात मी उभा आहे. पोलीस आणि महसूल यंत्रणेने धाड टाका अन्यथा मी टाकणार हे लक्षात ठेवा.